ब्रेकिंग… मारेगावचे नगरसेवक जितेंद्र नगराळे अपघातात गंभीर जखमी

 

वणी – गणेशपूर रोड लगत पुलाच्या शेजारी पडली कार 

 मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 17 चे नगरसेवक जितेंद्र नगराळे यांचे स्वतःचे कारच्या वाहनावरून नियंत्रण सुटून रोडच्या कडेला पडल्याने झालेल्या अपघातात नगराळे हे गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्देवी घटना दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजताचे दरम्यान घडली.

 

प्राप्त माहितीनुसार, नगरसेवक हे कायर रोडवर असलेल्या एका हॉटेल मधून आपल्या सवंगडीचा वाढदिवस साजरा करून स्वतःच्या इको स्पोर्ट कार ने मारेगाव कडे निघाले. स्वतः कार चलवित असतांना वाहनावरून नियंत्रण सुटून गणेशपूर रोड लगत निर्गुडा नदी शेजारी असलेल्या पुलाच्या बाजूला दोनदा पलटी घेत यात जितेंद्र नगराळे जखमी झाला.

 

लागलीच वणी येथून नागपूर येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले असून त्यांच्या डोक्याला साधारण तर छातीला जबर मार असल्याची माहिती असून तूर्तास वैद्यकीय नियंत्रनेत अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment