– शेतकरी, बेरोजगार व महागाईवर मारोती गौरकार यांनी घेतले फैलावर
-विविधांगी प्रश्नांच्या भडीमाराने अधिकारी निरुत्तर
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारचा संकल्प विकसित भारताचा रथ मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे पोहचताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी शेतकरी, बेरोजगारी, महागाईवरील प्रश्नांचा भडीमार करीत रथाला विरोध करीत गावाबाहेर हाकलले. यात अधिकारी निरुत्तर होत काढता पाय घेतल्याने अशा आशयाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात संकल्प यात्रेचा रथ पालथे घालत असतांना अनेक गावात विरोधाला समोर जावे लागत आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजना, बिमा योजना, पीएम निधी, उज्वला योजनाची नागरिकांत जागरूकता करण्यात येत आहे. या उद्दिष्ठासाठी ही यात्रा असली तरी याला विरोध करण्यात येत आहे.
रथावर भारत सरकार हे नाव छोटं व पंतप्रधान मोदी सरकार ठळक केल्याचा विरोध होत आहे. भारत सरकार लिहिणे अनिवार्य असतांना पिसगाव येथे मारोती गौरकार यांचेसह नागरिकांनी प्रचंड विरोध करीत जनतेच्या पैशातून मोदी सरकार या रथातून भाजप चा प्रचार का करत आहे यावर अधिकारी निरुत्तर झाले.
परिणामी, पिसगाव येथील नागरिकांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करता का? असा संतापजनक सवाल करीत गौरकार यांनी रथ गावातून हाकलून लावला.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या सर्व योजना कोण्या एका व्यक्तीच्या नाही.हा रथ पक्षाचा प्रचाराचा एक भाग असल्याचा आरोप करीत जुमलेबाजी व थापाभाजी असल्याचाही अनुभव कथन करण्यात आला . हमी भाव देणे, त्यांचे उत्पन्न दुप्पट देणे, प्रत्येकाला घर देणे, भ्रष्टाचार संपविणे असे आश्वासन मोदी सरकारचे खोटी ठरले आहे. त्यामुळे हमी नव्हे तर जुमला असल्याचा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या. कोणतीही व्यक्ती देशा पेक्षा मोठी असू शकत नाही. रथावर लावलेले नाव व फोटो असवैधानिक आहे. एकूणच रथावर आक्षेप घेत विविध प्रश्नांची सरबत्ती करीत प्रचंड विरोध करण्यात आला.
मारेगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या रथावरील आक्षेप व प्रश्नांच्या भडीमाराचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत हजारोंनी सहमतीची फुंकर अधोरेखित केली आहे.