तस्करांच्या मुसक्या आवळल्या… अवैध वाळूचा ट्रक जप्त

 

– मारेगाव महसूल विभागाची कारवाई

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

तालुक्यात अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनावर लगाम लावण्याचे कार्य महसूल विभागामार्फत जोमात सुरु असतांना रात्री पुन्हा एका ट्रक वर जप्तीची कारवाई करण्यात आली.

 

कोसारा तालुका मारेगांव शिवारात असलेल्या सोईट ते खैरी रोडवरुन अवैध रेती उत्खनन करीत असताना पकडण्यात आलेला ट्रक विकास मिना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार आणि नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १७/जुलै रोजी रात्री कोसारा शिवारातील सोईट तालुका वरोरा ते खैरी रोडवरुन अवैध रित्या रेती उत्खनन करून वाहतूक करीत असताना श्री उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव, तलाठी गजानन वानखेडे, चैतन्यकुमार शिंगणे, सनदेवल कुडमेथे, विवेश सोयाम, विठ्ठल सरनाईक, शिपाई किशन वेले, कोतवाल दिलीप पचारे यांनी मोठ्या शिताफीने जवळपास १३ ब्रास वाळू ची वाहतूक करीत असताना ट्रक संयुक्तपणे पकडून तहसील कार्यालय मारेगांव चे परिसरात लावण्यात आलेला आहे.

 

महसूल विभागामार्फत होत असलेल्या कारवाईचे सातत्य असतांना मुजोर तस्करांचे मनसुबे दिवसागणिक वाढत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment