– समाजकटकांना तात्काळ अटक करण्यासाठी एसपी कडे निवेदन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती विजासन बुद्ध लेणी येथील करुनेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध रूपाची विटंबनेचा मारेगाव येथील फुले – शाहू – आंबेडकर विचार मंच वतीने निषेध व्यक्त करीत समाजकंटकांना तात्काळ अटक करून फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली.
भद्रावती विजासन बुद्ध लेणीत असलेल्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्ध रुपाला जातीयवादी समाजकंटका करवी दि.1 जानेवारी रोजी मध्यरात्री विटंबना करण्यात आली. सकाळी उपासकांच्या ही बाब निदर्शनास येताच संताप व्यक्त करण्यात आला.या काळीमा फासणाऱ्या घटनेचे मारेगाव येथे पडसाद उमटून जाहीर निषेध करण्यात आला.
मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्फत यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ. पवनकुमार बनसोड यांना देण्यात आलेल्या निवेदनात समाजकंटकांचा कसून शोध घेत अटक करण्यात यावी व जलदगतीने न्यायालयीन कामकाज करून फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना याप्रसंगी विलास रायपुरे, गजानन चंदनखेडे, ज्ञानेश्वर धोपटे, राजू बदकी, शब्बीर खान पठाण, चांद बहादे, साहेबराव नागोसे, प्राणशील पाटील, गणेश सोयाम आदींची उपस्थिती होती.