उभारी… अर्धा डझण लोकांनी हातात घेतला पंजा

खा.प्रतिभाताई धानोरकर व तालुकाध्यक्ष आसुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बळकटी सह उभारी मिळण्यासाठी तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह जवळपास सहा जणांनी काँग्रेस पक्षावर निष्ठा अधोरेखित करीत पक्ष प्रवेश केला.

 

आज सोमवारला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वावर व काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. वसंतराव आसुटकर यांच्या मार्गदर्शनात बोटोणी गावचे माजी पोलीस पाटील मुकुंदरावजी बदखल, माजी उपसरपंच श्री पांडुरंगजी ढुमणे,श्री हसनभाई ( मुन्नाभाई) हभवानी,श्री बंडूभाऊ मेश्राम (मारेगाव), प्रा. संतोष दुमोरे (मारेगाव), बाळकृष्ण वासेकर (मारेगाव) यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.

 

जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख कायम असून पक्षावरील अधिकच्या ताकदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला.

 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संजयजी खाडे, माजी महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर यांचेसह जिल्हा काँग्रेस सेवादल तथा कृ. ऊ. बा. समितीचे सभापती श्री राजीव कासावार खालीद पटेल, उदयजी रायपुरे , यादवराव पांडे, तुळशीराम पेंदोर , रविंद्र धानोरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, अरविंद वखनोर, विनोद आत्राम, मंगेश ऊईके, समीर सय्यद, माणिकराव पांगुळ, गंगाधरजी ठावरी ,रोशन हरबडे यांची उपस्थिती होती.

 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment