मारेगावात 15.50 तोळे सोनं,09 तोळे चांदीवर चोरट्याचा डल्ला

रोख रक्कमही हडप

– अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

येथील प्रभाग क्रं. 14 भिवाजी नगरीत घरात ठेवलेल्या पर्स मधील तब्बल साडे पंधरा तोळे सोनं व नऊ तोळे चांदी सह अकरा हजार रोख असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबविल्याने एकच खळबळ उडून जनतेत भितीचे सावट पसरले आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, येथील भिवाजी नगरात वसंतराव कौरवार यांचे दुमजली घरात सुशील जंगेवार हे किरायाने राहतात.

 

दि. 04 एप्रिल रोजी आभूषने मामाने फिर्यादी सुशील यांच्या पत्नी कडे सुपूर्द केले.सुशील यांच्या पत्नीने हे आभूषण मोठ्या पर्स मध्ये टाकून पर्स देवघराच्या बाजूला असलेल्या धान्य कोटीवर ठेवली.

 

7 एप्रिल रोजी आभूषण सुरक्षित ठेवण्यासाठी दुपारी शोधाशोध केली मात्र ती पर्स घरात आढळली नसल्याने जंगेवार कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान, या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी ‘चोर’ पकडण्यात चौफेर तपासाची चक्रे फिरविली असली तरी तगडे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. परिणामी, या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांत प्रचंड दहशत पसरली आहे.

 

पर्समध्ये “हे” होते अलंकार…!

3.5 तोळे चपलाकंठी, रिंग अंगठी 5 ग्रॅम,7 ग्रॅम चौकोनी अंगठी, 2 ग्रॅम रिंग अंगठी दोन, अर्धा ग्रॅमची नथ, 35 ग्रॅम काळी पोत, 18 ग्रॅम नेकलेस, कानवेल 10 ग्रॅम, कानातले 4 ग्रॅम, चेन 17 ग्रॅम,ब्रासलेट 16 ग्रॅम, सोन्याचे पेंडाल 5 ग्रॅम, मंगळसूत्र 1 ग्रॅम, पदक 1 ग्रॅम, चांदीचे चाळ 4 तोळे, चांदीचे कळ 5 तोळे

 

ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल

मारेगावातील गंभीर घटनेची तक्रार दाखल होताच प्रशासनाने जलदगतीने पावले उचलत आठ जणांची ठसे तज्ज्ञ चमू घटनास्थळी पाचारण करण्यात आली. एसडीपीओ सुरेश दळवी, ठाणेदार शाम वानखेडे यांनीही घटनास्थळी भेट देत चौकशी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment