– वरिष्ठाकडे तक्रार मात्र बेदखल
– न्यायालयात दाद मागण्याचा ईशारा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून सगणापूर अंगणवाडी मदतनीस पदाची भरती नियमबाह्य केल्याचा आरोप करीत वरिष्ठाकडे तक्रारी केल्या. मात्र न्याय मिळत नसल्याने आता पिडितेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा ईशारा दिल्याने झालेल्या निवड प्रक्रियेवर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.
मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे अंगणवाडी मदतनीस ची पदभरती करण्यात आली.सदर पदभरती केलेली उमेदवार ही विवाहित असून तिचे सासर वनोजा देवी येथील आहे.ती केवळ ही नोकरी आपल्या वाट्याला यावी यासाठी सासुरवाडी सोडून माहेरी आहे. विवाहा नंतर अपत्य असतांना तिने वडिलांचे नावे असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली. ही निवड प्रक्रियेची चूक असून नियमबाह्य निवड करण्यात आल्याचा आरोप सुषमा सुगत जीवने हिने केला आहे.
दरम्यान, जिवने ही कायम सगणापूर वास्तव्यात असतांना जाणीवपूर्वक डावलून वेगळी निवड झाल्याने संबंधित विभागाबाबत साशंकता निर्माण होत आहे.मुलाखती नंतर निवड करण्यात किमान एक महिन्याचा कालावधी लागल्याने या वेळेतच निवड प्रक्रियेत माशी शिंकली चा आरोप सुषमा जिवणे हिने केला आहे.
परिणामी ही निवड नियमाचे उल्लंघण करून केल्याने आता आपण न्यायालयात जाऊन दाद मागू व सत्याचा विजय करू असा आशावाद जिवने हिने व्यक्त केला.
नियम व अटीला धरून गुणाचे मूल्यमापन करता येते. यात निवड झालेली व्यक्ती ही सरस होती. गावपातळीवरील कागदपत्राची तपासणी व गुणाच्या आधारे झालेल्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
दीपक कळमकर
बाल विकास प्रकल्प अधिकारी मारेगाव