– जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व श्री लखाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव तालुका राळेगाव च्या वतीने झाडगाव येथे 28 ते 29 डिसेंबर दरम्यान 51 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ प. स. मारेगाव ने उच्च प्राथमिक आदिवासी विभागातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार प्रा. डॉ.अशोक उईके यांनी केले. स्वागताध्यक्ष शिक्षक आमदार अरुण सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील खाजगी तथा जिल्हा परिषद शाळांनी सहभाग घेतला होता.
बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, प्रमुख अतिथी चित्तरंजन कोल्हे,शिक्षणाधिकारी(माध्य)जयश्री राऊत, उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे,गटशिक्षणाधिकारी सरला देवतळे यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ येथील विज्ञान शिक्षक श्री संजय आनंदराव फुलबांधे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीचे विद्यार्थी यश रमेश पाचपोहर व रुद्र राजू थेरे यांनी फवारणी पंपावर चालणारे कुलर हा प्रयोग सादर केला होता. उच्च प्राथमिक आदिवासी गटातून या प्रयोगाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनित या प्रयोगाची निवड झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प. स. मारेगाव चे गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर, विस्तार अधिकारी शेडमाके साहेब, केंद्रप्रमुख सूर्यभान चिडे, पहापळ शाळेचे मुख्याध्यापक श्री एन .टी .चौधरी , सहा. शिक्षक अमर पुनवटकर, दीपमाला वाघमारे, शीला गोंडे, यांनी कौतुक केले. पहापळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल गुरूनुले , सरपंच श्री .राहुल आत्राम, तसेच पेसा समिती अध्यक्ष श्री.भैय्याजी कन्नाके व सर्व गावकरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या.