– महसूल विभागाची कुंभा येथे मध्यरात्री कारवाई
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
कोसारा घाटातून आयवा वाहन भरून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या महसूल विभागाने करडी नजर ठेवत मध्यरात्री छापा मारत वाहन जप्त केल्याने तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.सदर छापा शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताचे सुमारास टाकण्यात आला.
मारेगाव तालुक्यातील निवडक घाट तूर्तास बंद असून वाळू तस्करांचे चांगलेच फावत आहे. अशातच मारेगाव तहसीलदार निलावाड यांच्या व्यूव्हरचनेने अलीकडेच तस्करांचे कंबरडे मोडले आहे.दरम्यान, तस्कराने तहसीलदार बाहेरगावी गेल्याची गुप्त माहिती काढून आपले ईप्सीत साध्य करीत कोसारा घाटातून वाळूची तस्करी करीत कुंभा येथे येत असतांना महसूल विभाग दबा धरून होते.
अवैध वाळू भरलेला आयवा वाहन क्रमांक एम. एच.32 ए. के.4446 वर छापा टाकत शनिवारच्या मध्यरात्री जप्त केला. या कारवाइने तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहेत.
सदरील कारवाई तहसीलदार यु. एस.निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी सनदेवल कुडमेथे, विवेक सोयाम, कोतवाल राजू गायकवाड, अमित कोयचाडे यांनी केली.