आत्महत्येची धग… वेगावच्या इसमाचा करणवाडीत गळफास

– चार दिवसापासून होता बेपत्ता

– मारेगाव तालुक्यात 48 तासात तिसरी आत्महत्या 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील वेगाव येथील इसम गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असतांना आज करणवाडी शिवारात पळसाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवार ला सायंकाळी उघडकीस आली.

ओमराज सूर्यभान राजुरकार असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील एका गावात ठाण मांडून बसलेल्या भोंदू महाराज यांच्या दिंडीत ते गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे काही दिवसापूर्वी गेले होते. तेव्हापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ओमराज हे गेल्या चार दिवसापासून घरातून निघून गेल्याची समाजमाध्यमावर वार्ता फिरत होती. कुटुंबातील सदस्यांनी गणगोताकडे शोधाशोध घेतली मात्र त्यांचा शोध लागला नव्हता.

आज गुरुवारला ओमराज यांचा मृतदेह करणवाडी शिवारात एका पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला.

मारेगाव तालुक्यात अवघ्या 48 तासात तीन आत्महत्येने तालुक्यात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या आत्महत्येने मारेगाव तालुका आत्महत्येचे हब बनत असल्याची साशंकता व्यक्त होत आहे.

परिणामी, मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment