भाजपा तालुकाध्यक्षपदी अविनाश लांबट 

– जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे स्वाक्षरीनिशी नियुक्ती पत्र प्रदान

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

     मावळत्या तालुकाध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्ठात आल्यानंतर मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते अविनाश लांबट यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने तालुक्यात भाजप ला पुन्हा उभारी मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

 

    अविनाश लांबट हे मागील दहा वर्षांपासून राजकीय चळवळीत सक्रीय असून त्यांनी गेल्या काही महिण्यापूर्वी तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. भाजप समर्थित कृ. ऊ. बाजार समितीची निवडणूक लढवित विजय संपादन केला. बाजार समितीचे ते विद्यमान संचालक व सिंदी महागाव येथील उपसरपंच आहेत.

 

     मृदू स्वभाव अन वंचित जनतेला न्यायिक भूमिकेत सदोदित अग्रेसर असणाऱ्या लांबट यांचेकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून भाजप जिल्हा कार्यकारिणीने त्यांच्या तालुकाध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

 

    दरम्यान, लांबट हे आपल्या नियुक्तीचे श्रेय ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना देतात. परिणामी अविनाश लांबट यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment