आत्महत्येची धग… मारेगाव तालुक्यात दोघांनी घेतले विष

हटवांजरी व चिंचाळा येथील इसमांचा मृत्यू
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड )व चिंचाळा येथील इसमांनी कीटकद्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवार ला घडली. तालुक्यात आत्महत्येच्या सत्राची रिघ लागत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

अंकुश महादेव मडावी वय अदांजे 40 वर्ष रा.खापरी(ह. मु. हटवांजरी पोड) असे मृतकाचे नाव आहे. मृतक मागील काही वर्षापासून सासुरवाडी हटवांजरी (पोड) ला रहात होता.शेतमजुरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. अशातच दिनांक 26 डिसेंबर रोजी मंगळवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास सासऱ्याच्या शेतात त्याने विषारी औषध प्राशन केले.मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविले . मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यु झाला.
त्याचा मागे पत्नी,एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.

आत्महत्येच्या दुसऱ्या घटनेत तालुक्यातील चिंचाळा येथील वृद्ध इसमाने आपल्या राहत्या घरी विष ग्रहण करून जीवनयात्रा संपविली.
भाऊराव थेटे (75) या वृद्धाने बुधवार च्या रात्री विष प्राशन केले. मारेगाव रुग्णालयात तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असल्याचे कळते.

दोघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र तालुक्यातील दिवसागणिक आत्महत्येच्या घटनांनी तालुका प्रभावित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment