आत्महत्येची धग… शेतकरी पुत्राने घेतला शेतात गळफास

मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील घटना

मारेगाव :विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यात आत्महत्येचा आलेख थांबता थांबत नसतांना आज शुक्रवार ला कोलगाव येथील शेतकरी पुत्राने शेतातील झाडाला गळफास घेत ईहलोकाची यात्रा केल्याची घटना सकाळी दहा वाजता उजेडात आली.

प्रदीप नानाजी अवताडे (38)असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. वडिलांकडे असलेल्या शेतीसह इतरही मोलमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा.प्रदीप हा नेहमीप्रमाणे कोलगाव शिवारात असलेल्या शेतात गेला आणि झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत काहींना निदर्शनास आला.ही माहिती कुटुंबाला मिळताच एकच हंबरडा फोडला.

दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असून मृतक प्रदीप यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment