धक्कादायक…. विद्युत स्पर्शाने मिस्त्री मजुराचा मृत्यू

– घरावरील विद्युत तारा ठरल्या काळ 

  • – मृतक मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील युवक

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव येथील एका घराच्या कामावर असलेल्या मिस्त्री मजुराचा जिवंत विद्युत ताराला स्पर्श होवून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज शनिवार ला सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान प्रभाग क्रमांक 6 मध्ये घडल्याने सर्वत्र शोककळा व्यक्त होत आहे.

 

प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (29) रा. देहेगाव ह. मु. मांगरूळ ता. मारेगाव असे मृतक युवक कामगाराचे नाव आहे.

 

प्राप्त माहितीनुसार , मारेगाव येथील प्रभाग क्रमांक सहा मधील वाहिद शेख यांचे घरी संडास आणि बाथरूम चा स्लॅब टाकण्यासाठी काही मजूर कार्यरत होते. त्यात प्रफुल्ल हा संडास वर चढून सलाख टाकत असतांना त्यावर असलेल्या वीज कंपनीच्या 11 केव्ही. जिवंत विद्युत तारेला सलाख स्पर्श झाल्याने जबर धक्का लागून प्रफुल्ल याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, मृतक हा मागील सहा महिन्यापासून मांगरूळ येथील काका कडे परिवारासह मिळेल ते काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. कष्टकरी, निर्व्यसनी व सालस असा त्याचा स्वभाव या दुर्देवी घटनेने मनाची काहीली माजवित आहे. परिणामी वेदनादायी घटनेने ग्रामीण रुग्णालयात आईचा टाहो हृदय पिळवून टाकणारा होता.

 

मृतक प्रफुल्ल यांच्या पश्चात आई वेणूताई, वडील विठ्ठलराव , पत्नी सोनाली, चार वर्षीय मुलगी खुशी, दीड वर्षाचा रुद्रा नामक मुलगा व लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment