– मारेगाव येथील विविध समस्या संदर्भात निवेदन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील विविध समस्या तात्काळ सोडविण्याकरता तालुका भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री यांना साकडे घालण्यात आले.
तालुक्यातील बेरोजगारीची समस्या दिवसागणित गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे शहराच्या बाहेर एम आय डी सी ची जागा तीस वर्षापासून पडीत आहेत. आजतागायत एकही उद्योग या ठिकाणी उद्यास आला नाही. त्यामुळे बेरोजगारांची मोठी फौज तालुक्यात निर्माण झाली.
या जागेवर त्वरित उद्योग उभारून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करावा. तसेच अस्तित्वात असलेले 33 केव्ही विज केंद्र वीज पुरवठा करण्यास असक्षम ठरत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होते.
शेतकऱ्यांनी शेतपिक जगविण्याकरिता व उत्पन्नात वाढ करण्याकरिता शेतात पाण्याची सोय उपलब्ध केली . मात्र वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांना सिंचन करता येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडून आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेत आहे. त्यामुळे 132 केव्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करावे. तर मागील पाच वर्षापूर्वी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानक करिता जागा अधिग्रहित करण्यात आली.
मात्र अजून पर्यंत बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यामुळे तात्या निधीची तरतूद करून बस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी असे आश्वासन दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी तालुका भाजप अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे ,नगरसेवक वैभव पवार, प्रशांत नांदे ,अनुप महाकूलकर ,रवी टोंगे सह आदी उपस्थित होते.