मारेगावात धम्म क्रांती मेळावा… डॉ. राजरत्न आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक

– सामाजिक, राजकीय तथा वर्तमान स्थितीवर करणार भाष्य

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शनात धम्म क्रांती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, राज्य सचिव सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सतीश इंगोले यांचेसह विजय भरणे, विजय लेले, विशाल इंगोले, अर्जुन बरडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

येत्या 24 डिसेंबर रोजी रविवारला दुपारी 12 वाजता स्थानिक बदकी भवनात आयोजित मेळाव्यास तमाम जनतेंनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

डॉ.राजरत्न अशोक आंबेडकर हे भारतातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. ते सक्रीय सामाजिक तथा राजकीय आणि बौद्ध कार्यकर्ते आहेत.

 

राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असून ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. ते बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे समग्र विचार लोंकापर्यंत पोहचवित आहे.

 

दरम्यान, मारेगाव येथील धम्म क्रांती मेळाव्यात सामाजिक राजकीय तथा वर्तमान स्थितीवर भाष्य करणार असल्याने सदर वैचारिक प्रबोधनाचा जनतेंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment