– कामबंद आंदोलनात विविधांगी संघटना एकवटल्या
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संवेदनशील मागण्याच्या पूर्ततेसाठी विधानभवनावर मोर्चा धडकवत शासनाचे लक्ष वेधले एवढेच नव्हे तर शासनाला पुन्हा जागे करण्यासाठी तालुकास्थळी काम बंद आंदोलन पुकारल्याने ग्रामपंचायत कार्यालय तब्बल तीन दिवस कुलूपबंद राहणार आहे.या आंदोलनाला पाठींबा देत विविध संघटना एकवटल्या आहेत.
स्थानिक पंचायत समिती समोर उभारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्याकरिता गावपातळीवरील ग्रामपंचायत कार्यालय बंद करण्यात आले. यात किमान सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक ऑपरेटर सहभागी झाले.
परिणामी, काम बंद आंदोलनात प्रभागनिहाय निधी, विमा संरक्षण, विभागातून सरपंच आमदार, सरपंच भवन, पीएफएमएस प्रणाली चीं तांत्रिक अडचण दूर करून धनादेश करावी देयके प्रदान करावी, ग्राम विकासाला किमान वार्षिक दहा लाख विकास निधी देण्यात यावे, पंधरा व्या वित्त आयोग निधीत वाढ करण्यात यावी. आदी विकासाभिमुख प्रश्न घेवून काम बंद आंदोलन लक्ष वेधत असून ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी हे पदे एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. यासह ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, ग्रा. पं. कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्या घेवून आंदोलनात सहभागी झाले आहे.