मारेगावात अक्षता कलशांचे जंगी स्वागत

– शोभा यात्रेच्या मिरवणूकीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

येत्या 22 जानेवारीला श्री क्षेत्र अयोध्या येथे श्री रामलल्लेच्या प्राणप्रतीष्ठा होणार आहे.या महासोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशाचे मारेगावात शोभायात्रेच्या माध्यमातून जंगी स्वागत करण्यात आले.भजनाच्या माध्यमातून जय श्रीरामाचा जयघोष अशाच जल्लोषपूर्ण वातावरणात मारेगावात शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत असंख्य भाविक सहभागी झाले होते.

तहसील कार्यालयापासून निघालेली शोभायात्रा राज्यमहामार्गाने मार्गक्रमण करीत मार्डी रोडने नगरपंचायत नजीकच्या हनुमान मंदिरात नेण्यात आली.यावेळी भगव्या रंगाच्या पताकाने वातावरण भगवेमय झाले होते.या मंगल कलशाचे अत्यंत भक्तीभावाने पूजन करण्यात आले.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून अभिमंत्रित केलेल्या अक्षता कलशाचे मारेगावात 16 डिसेंबरला आगमन झाले. प्रत्येक घरी जाऊन अक्षताचे वाटप करण्यात येणार आहे.

रामजन्मभूमी निधी गोळा करून सहभाग दर्शविणाऱ्यांना प्राणप्रतिष्ठानाला जाणे अशक्य असल्याने त्याचे साक्षीदार होण्यासाठी अक्षदा कळस मारेगावात दाखल झाला असून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रन्यास अयोध्या समितीचे संयोजक निखिल दिनेश मेहता, सह संयोजक शुभम धानोरकर, तालुका समन्वयक अनुप महाकुलकर, बजरंग दल संयोजक पंकज पिदूरकर, निलेश बेंडे आदींचा पुढाकार होता.नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, वैभव पवार, राहुल राठोड यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment