वाळू तस्करांच्या मुजोऱ्याचा कळस… कारवाईच्या भितीने ट्रॅक्टर टाकला खाईत

– ट्रॅक्टर घेवून मालक पसार : ट्रॉली प्रशासनाने केली जप्त 

-महसूल प्रशासनाची शिवणी येथे कारवाई

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

वर्धा नदीतून चोरट्या मार्गाने वाळू तस्करांचा उच्छाद कायम असून महसूल विभाग कारवाईच्या मागावर असतांना किमान अर्धा डझन आपले वाहन घेवून वाळू तस्करांनी पोबारा केला मात्र एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी मंडल अधिकाऱ्याचा ससेमिरा टाळण्यासाठी ट्रॅक्टर खाईत टाकला. ट्रॅक्टर मालकाने हे वाहन डायरेक्ट करीत पसार झाला. पंचनामा करून ट्रॉली ताब्यात घेण्यात आली असून याबाबतची रीतसर तक्रार महसूल प्रशासनाकडून पोलिसात करण्यात येणार आहे.

 

मारेगाव तालुक्यातील शिवणी धोबे येथील वाळू तस्कर वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. किंबहुना शनिवारच्या मध्यरात्री किमान सह तस्कर आपले ट्रॅक्टर वाहनाणे हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या मागावर आहे.

 

दरम्यान मध्यरात्री मंडल अधिकारी श्री.घुगाने हे मागावर असतांना तब्बल पाच वाळू भरलेले ट्रॅक्टर पसार होण्यात यशस्वी झाले मात्र एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असता थेट ट्रॅक्टर खाईत टाकला. काही वेळात ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर डायरेक्ट सुरु करून निघून गेला.खाईत टाकलेली ट्रॉली जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे.ट्रॅक्टर मालक निलेश रासेकर रा. शिवणी धोबे यांचे विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महसूल सूत्रांकडून प्राप्त झाली.

 

परिणामी, वाळू तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग अँक्शन मोडवर येत वाळू तस्करांचे मनसूबे हाणून पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार निलावाड, मंडल अधिकारी घुगाने सातत्याने प्रयत्नशील आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment