संवेदना… कर्तव्यावर असतांना मारेगाव आरोग्य सहाय्यकाची एक्झिट 

– आरोग्य विभागात शोककळा

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कार्यरत आरोग्य सहाय्यक मंगेश आनंदराव कोकाटे रा. नेर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्षाचे होते. आरोग्य सहाय्यक यांच्या एक्झिटने आरोग्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.

मंगेश कोकाटे आरोग्य सहाय्यक म्हणून मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर होते. प्रशासकीय कामकाजात व्यस्त असतांना अचानक सकाळी 11 वाजता त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांनी तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करताच कोकाटे यांना मृत घोषित केले.

दरम्यान, आरोग्य सहाय्यक मंगेश कोकाटे यांच्या अकाली मृत्यूने आरोग्य विभागात शोककळा पसरली आहे.मृतक कोकाटे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment