खळबळजनक…. सराटी येथे 50 हजाराच्या देशीदारू साठ्यावर छापा

– विभागीय स्थानिक गुन्हे शाखा व मारेगाव पोलिसांची सयुक्त कारवाई

– संशायितास अटक : मुद्देमाल जप्त

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्रीला उत आला असतांना तालुक्यातील सराटी येथे गोपनीय माहितीच्या आधारे विभागीय स्थानिक गुन्हे शाखा व मारेगाव पोलिसांनी सयुक्त छापा मारून तब्बल 46 हजार 705 रुपयाची देशी दारू हस्तगत करीत संशायित आरोपीस अटक केली. आज गुरुवारला सकाळी 7 वाजता पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध व्यवसायिकात कमालीची धडकी बसली आहे.

 

तालुक्यातील सराटी येथे अवैध देशी दारूचा साठा मध्यरात्री दाखल झाल्याची गोपणीय माहिती पोलिसांच्या हाती लागताच भल्या पहाटे पोलीस पथक सराटी येथील संशायित विवेक नरहरी नरांजे यांचे निवासी धडकले. घराची झाडाझडती घेतली असता स्वयंपाक खोलीत अवैधरित्या 672 बॉटल्स भरलेले देशी दारूचे खोके आढळून आले.या कारवाईत किमान 46,705 चीं देशी दारू जप्त करीत संशायित विवेक नरांजे यास अटक करण्यात आली. विभागीय स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरिक्षक अतुल मोहनकरयांच्या मार्गदर्शनात सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुनिल पिदूरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके,जमादार रजनीकांत पाटील, राजू टेकाम यांनी ही कारवाई केली.

 

मारेगाव तालुक्यातील अनेक गावात अवैध देशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरकस आहे. तालुक्यातील बहुतांश गावात दुचाकी वाहनाने थेट मध्यरात्री मारेगाव, वणी व शिबला येथून देशी दारू पुरविण्यात येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होवून कुटुंबात कलहाचे वातावरण आहे.किंबहुना तालुक्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.पोलिसांनी कारवाईचा रेशो कायम ठेवून अवैध व्यवसाईकांचे मुसके आवरत लगाम लावावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment