Breaking News

कालबाह्य औषधे जंगलात फेकणे पडले महागात..

मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द 

– व्यावसिकात प्रचंड खळबळ 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

जुलै महिन्यात तहसीलच्या जळका जगल व्याप्त भागातील पांढरदेवी मंदिर परिसराच्या जंगलात कालबाह्य झालेली औषधे संशयास्पदरित्या फेकण्यात आल्याने खळबळ माजली होती.याची गंभीर दखल घेत प्रशासनाने सखोल चौकशी अंती

वणी टागोर चौक येथील श्रेयश डीस्ट्रीब्युटर्स वितरकाचा परवाना कायम स्वरुपी रद्द केला आहे. त्यामुळे व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.

सदर कालबाह्य औषधी प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.पोलिसांनीही अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

अन्न व औषध विभागाला औषधांच्या पेट्यांवर बॅच क्रमांक मिळताच त्यांनी वणी उपविभागातील सर्व औषध दुकानांची झाडाझडती घेतली. त्यात वणी टागोर चौकातील श्रेयश औषधी वितरकाचे बॅच क्रमांक संगणकीय नोदी जुळल्या. चौकशी अगदी बारकाईने करण्यात आली.त्यात श्रेयश वितरक दोषी आढळून आला. 10 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार श्रेयश डीस्ट्रीबुटर्स परवाना कायम स्वरुपात रद्द करण्यात आला.या कारवाईने वणी मारेगाव झरी पांढरकवडा येथील औषध चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

वणी येथील होलसेल विक्रेता श्रेयश डीस्ट्रीबुटर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे .कोणत्याही परवाना रद्द करण्याच्या कारवाईत 90 दिवसांनंतर रद्द होईल. सदर आदेश २६ फेब्रुवारी २०२४ पासून अमलात येईल.

मिलिंद काळेश्वरकर

  आयुक्त अन्न व औषध प्रशासन,वतमाळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment