– बोटोणी नजीक घटना
बोटोणी – सुनिल उताणे
वणीवरून करंजी कडे जाणाऱ्या दुचाकीला रानडुक्कर आडवा आल्याने दुचाकी वरील दोघे जन गंभीर जखमी झाल्याची घटना बोटोणी राज्यमहामार्गांवर आज मंगळवार ला सकाळी 9 वाजता घडली.
पांडुरंग किसन कोल्हे व दादा महाडोळे रा. शास्त्री नगर वणी असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे.
MH 29 BS 2521या दुचाकीने हे दोघे वणीवरून करंजी कडे जात असतांना बोटोणी समोर राज्य महामार्गांवर रान डुक्कर आडवा येत दुचाकीला धडकला यात दुचाकीस्वार रोड वर कोसळत गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना मारेगाव रुग्णालयात हलविण्यात आले आहे.