Breaking News

गोंडबुरांडा : उपसरपंचपदी सुनिल देऊळकर

– अविरोध निवडीने ग्रामस्थांत जल्लोष

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील गोंडबुरांडा येथील उपसरपंचपदी सुनील हरिश्चंद्र देऊळकर यांची अविरोध निवड करण्यात आली.

 

आठ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मधील महिन्याभरापूर्वी जनतेतून लता उईके ह्या सरपंचपदी आरूढ झाल्या होत्या. उपसरपंच पदाची निवड सोमवारला करण्यात आली.

 

सदर पदाकरिता देऊळकर यांचे एकमेव नामांकन दाखल करण्यात आले होते .यासाठी अमोल पेंदाम हे सूचक तर मंगला शेंदरे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व सदस्यांनी पाठींबा दर्शवित सुनिल हरिश्चंद्र देऊळकर यांची यांची उपसरपंच म्हणून अविरोध निवड करण्यात आली.

 

निवडणूक अधिकारी म्हणून एस. ए. काटकर यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सभासदांची उपस्थिती होती. देऊळकर यांच्या निवडी नंतर ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment