Breaking News

भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हैदोस… मारेगावात इसमास केले गंभीर जखमी

– बंदोबस्तानंतर श्वानांचा बेसुमार आकडा फुगला

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगावात पुन्हा भटक्या कुत्र्यांचा आकडा फुगत एका भटक्या कुत्र्याने साठ वर्षीय इसमास ओरबडून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी घडल्याने नागरिकात धडकी भरली आहे.

कादर कुरेशी रा. मारेगाव असे जखमी झालेल्या इसमाचे नाव असून प्रभाग क्रमांक 14 मधून पायदळ जात असतांना एका भटक्या कुत्र्याने हल्ला चढवीत हात आणि डोक्याला चावा घेतला.

 

अचानक चढविलेल्या हल्ल्यात कादर हे खाली पडले. शेजारच्या लोकांनी आरडाओरड करताच श्वानाने पळ काढला.

 

दरम्यान,वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त श्वाणांनी काही महिन्यापूर्वी मारेगावकरांत चांगलीच दहशत निर्माण केली होती. यात चावा घेत एका महिलेचा मृत्यूही झाला होता तर तिघांना जखमी करीत अनेक पशुधनावरही हल्ला चढविला होता.

नगरपंचायत प्रशासनाने श्वानांचा बंदोबस्त करीत शेकडो श्वान आउट ऑफ कव्हरेज एरियात सोडले होते. मात्र मोकाट कुत्र्यांचा कळप पुन्हा मारेगावात दखल होत नागरिकांच्या जीवावर उठत असल्याने मारेगावकरांच्या दहशतीत भर पडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment