– राजू उंबरकर यांची तात्काळ मदत ठरली जगण्याचा आधार
– अभागी मातेने डबडबलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मारेगाव : दीपक डोहणे
सदैव त्यांच्या जीवनाला चिकटलेलं अठराविश्व दारिद्र्य.अशातच काही वर्षांपूर्वी आईच्या कपाळावरील कुंकू नियतीने पुसले.आई, दोन मुलं आणि वार्धक्य आलेले आजी,आजोबा असा कुटुंब कबीला. मिळेल ते काम करणे अन कसाबसा कुटुंबाचा गाडा हाकने असा त्यांच्या दिनक्रम. चार दमडीवर ते कुटुंब समाधानी असतांना आक्रित घडले.धाकट्या मुलीला अपेंडिक्स आजाराने ग्रासले. हातात चार पैसे नसल्याने उपचार कसा करावा हा गंभीर प्रश्न आई सुषमा हिच्या मनात घिरट्या घालत होता. समोर सारा अंधार होता.अशातच राजू उंबरकर हा देवदूत अवतरला. मुलीची गंभीर अवस्था पाहून तात्काळ भरती केले. शस्त्रक्रिया केली अन अवंतिका ला जगण्याचे नवे ऑक्सिजन मिळाले.
वणी उपविभागात सामाजिक दातृत्वाचा महामेरू म्हणून मनसे नेते राजू उंबरकर यांचेकडे बघितल्या जाते.पक्षाची मोट त्यांनी घट्ट बांधली. जन प्रश्न घेऊन हा झंझावत नेता ग्रामीण भाग पालथे घालत असतो. असा एक दौरा सुरु असतांना ते झरी तालुक्यातील महादापूर पोडात शिरले. येथील समस्याचे अवलोकन करतांना एका निरागस मातेने अवघ्या सोळा वर्षीय अवंतिका शंकर आडे नामक मुलीच्या प्रकृतीची आपबिती अश्रू गाळत उंबरकर समोर कथन केली. पैशाअभावी खाटेवर खितपत पडलेल्या तरुणीच्या असह्य वेदना मन हेलावून सोडत होते.लगेच नेहमीप्रमाणे राजू उंबरकर यांची संवेदनशीलता जागृत होवून तिला वणी येथील खाजगी दवाखाण्यात हलविले. तज्ज्ञ डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली असता काही तासात तिचा अपेंडिक्सचा फोड फुटण्याच्या स्थितीत असल्याचे सांगितले.लागलीच सामाजिक दातृत्व स्वीकारलेल्या राजूभाऊ उंबरकर यांनी यत्किंचतही वेळ न दवडता स्वखर्चाने अवंतिका वर शस्रक्रिया करण्यासाठी पुढे सरसावले अन अवघ्या काही तासात शस्रक्रिया यशस्वी होताच वेदनेचा व संभाव्य शक्यतेचा निःश्वास सोडला व अवंतीकाच्या जगण्याला बळ मिळाले.
आर्थिक मागासलेल्या आणि चतकोरासाठी दोन हात करणाऱ्या अभागीचे कपाळावरील कुंकू नियतीने काही वर्षांपूर्वी पुसलेत. एकीच्या बळावर दोन लेकरं अन साठीत असलेली सासरे सासू असा काफीला सांभाळत असतांना मुलीच्या गंभीर आजाराने तिच्या पायाखालची वाळू सरकली. हे वेदनादायी प्रसंग उघड्या डोळ्यांनी बघत उंबरकर सारखा देवदूत धावून आल्याचे ती सांगत आहे. तिच्या भावना अनावर होत ,अश्रूला वाट मोकळी करत तिने राजू भाऊ बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आता अवंतिका सुखरूप आहे.तिच्या वेदनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजूभाऊ उंबरकर यांची सकारात्मक फुंकर जीवनदायी ठरली. राजू भाऊ यांची माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जनतेप्रती असे काळीज असणारा नेता हवा.नुसतेच आश्वासनांचे फुकट फुगे वाटणारे नेते येथे खुजे ठरले.
अन् उदारमताचे काळीज ठेवणाऱ्या राजू उंबरकर यांची पिडीत जनतेप्रती असणारी खरी सामाजिक जाणीव पुन्हा एकदा आभाळभर झाली एवढे मात्र निश्चित..!