Breaking News

प्रधानमंत्री सडक योजनेचे काम रखडले

– कार्यकारी अभियंताचे दुर्लक्ष

– आष्टोना, मंगी , दहेगावचे नागरिकात रोष

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील सीमा लागत असलेल्या आष्टोना ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून

रखडले. त्यामुळे ह्या रस्त्या अंतर्गत येणाऱ्या आष्टोना, मंगी, दहेगाव गावातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

राळेगाव तालुक्यातील आष्टोना रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्ग पर्यंत सात किमी रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झाला. सदर रस्त्याला भरघोस निधी सुद्धा दिला गेला. सदर रस्त्याचे काम सुद्धा देण्यात आले. कंत्राट दारा मार्फत कामाला सुरुवातही झाली. मात्र मागील दीड वर्षापासून रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. सदर रस्त्याचे काम पूर्णत्वाचा कालावधी संपला असताना सुद्धा रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने अभियंत्यांची मिली भगत तर नाही ना असा प्रश्न गावकरी विचारत आहे. रस्त्यावर साधी दुचाकी सुद्धा जात नसल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे पंतप्रधान ग्राम सडक योजना अभिनेत्याने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शुभम पायघन, धीरज झाडे सचिन सरोदे, पंढरी रोगे सह आदींनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment