Breaking News

गारगोटी (पोड) येथे आदिवासी कला महोत्सवाचे आयोजन

 

मारेगाव | विटा न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील गारगोटी( पोड) येथे भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर श्याम दादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी कोलाम समाज सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन 30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक विधानसभा क्षेत्राचे आ. संजीव रेड्डी बोदकुलवार, तर अध्यक्षपदी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विशेष प्रमुख अतिथी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे , माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सह आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माजी आयुक्त उत्तम मानकर, माजी गटविकास अधिकारी मधुकर घसाडकर, कोलाम संघटना जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम राहणार आहे.

सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी कोलाम संघटना अध्यक्ष सूर्यभान ढोबरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश लांबट, भाजपा उपाध्यक्ष जयवंत ठेपाले, गणेश झाडे, सुषमा ठेपाले, सुनीता पांढरे, प्रवीण बोथले, आशिष खंडाळकर, श्रीकांत गौरकार, दिलीप आत्राम, प्रदीप दाहुले सह आदींनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment