Breaking News

लक्षवेधी मोर्चा तहसीलवर.. व्यवस्थेविरोधात चर्चा…हजारोंचा हाय होल्टेज “झटका मोर्चा”..!

– लेखी आश्वासनाने आंदोलनाची सांगता

– भर पावसात अन थंडीत हजारोंची उपस्थिती ठरली लक्षवेधी

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

अवकाळी पावसाचा धुमाकूळ.. वातावरणात गारवा..अधूनमधून पावसाच्या सरी.. बोचऱ्या थंडीने कुडकुडत पक्षावर असलेली शेतकरी, शेतमजूर आणि शिलेदारांची निष्ठा..व्यवस्थेविरोधात एल्गार पुकारत.. ढगाळी वातावरणात मनसेचा गुंजत असलेला आवाज..जनतेचे किंबहुना शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुकर करण्यासाठी..वीज कंपनीला हाय होल्टेजचा दणका देत.. हजारो मोर्चेकऱ्यांच्या साक्षीने झटका मोर्चा तहसीलवर धडकला..अन प्रशासनाची तारांबळ उडत अवघा परिसर विविधांगी मागणीने दुमदुमला.

मारेगाव तालुक्यात शेकडो गावे संलग्नित असतांना विजेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर येत जनता प्रामुख्याने शेतकरी कमालीचा त्रागला आहे.विजेचे पोल नसणे,नियमित विजपूरवठा खंडीत राहणे, पाच वर्षांपासून शेतकऱ्यांची वीज जोडणी नाही, कमी व उच्च दाबाने अनेक रोहित्र व घरगुती उपकरणे निकामी, सिंचनाचा प्रश्न आदी प्रश्नाला कंपनी बगल देत असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वास्तव आरोप असतांना यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी थेट कंपनीच्या तगलादू विरोधात घोषणा देत आज मंगळवार ला अवकाळी पावसात हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांचा झटका मोर्चा मार्डी चौकातून तहसील कार्यालयात पोहचला.

मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात तहसीलदार यांच्या दालनात उंबरकर सह शिष्ठमंडळ, तहसीलदार उत्तम निलावाड, उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र पाटील, क. अभियंता आशिष पवार, सहा. अभियंता अतुल आत्राम यांनी यावेळी संगोपांग चर्चा करीत शेतकऱ्यांना आठ तास अखंडीत विजपूरवठा, गावठाण फिडर वरील 24 तास विजपूरवठा, तालुक्यातील बंद असलेले रोहित्र दोन दिवसात पूर्ववत सुरु करण्याचे लेखी आश्वासन महावितरण कडून देण्यात आले.या जनसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हयगय केल्यास येत्या आठ दिवसात मनसे स्टाईल आंदोलन उभारण्याची तंबी उंबरकर यांचेकरवी याप्रसंगी देण्यात आली.

नसेचे हे संवेदनशील आंदोलन व्यवस्थेवर प्रहार.अवकाळी पावसात व बोचऱ्या थंडीत हजारोंची उपस्थिती लक्षवेधी ठरली.याप्रसंगी तालुक्यातील बहुतांश शेतकरी आणि पदाधिकारी सह कार्यकर्ते हजारोच्या संख्येत उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment