Breaking News

आंदोलन…. उद्या मारेगावात ‘ झटका मोर्चा ‘

– वीज कंपनीच्या तगलादू धोरणा विरोधात मनसे आक्रमक

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून उद्या दि.28 नोव्हेंबर ला मनसे चा “झटका मोर्चा ” तहसील कार्यालयावर धडकणार आहे.

वीज कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा कमालीचा मनस्ताप तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना अनाहुतपणे सहन करावा लागतो आहे. नव्हेतर विजेच्या लपंडावाने शेतातील उभे पिके करपल्या जात असून सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उत्पादणात कमालीची घट होवून शेतकरी आर्थिक दृष्ठ्या नागवीला जात आहे.सातत्याने विजेचा खंडीत पुरवठ्याने जनता कमालीची वैतागली असून यास नियंत्रित करण्यासाठी मनसे कडून उद्या आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.

मंगळवार ला सकाळी 11 वाजता मार्डी चौकातून तहसील कार्यालयात धडकणाऱ्या झटका मोर्चाचे नेतृत्व पक्षनेते राजूभाऊ उंबरकर करणार आहेत.तालुक्यातील तमाम जनतेनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शहराध्यक्ष चांद बहादे यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment