– चळवळीचे सातत्य फळाला
– कॉग्रेसने दिला आत्मसन्मानाचा ‘हात’
– सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
सदैव सामाजिक व राजकीय चळवळीत अग्रेसर असणाऱ्या युवा कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेवून बोरी खुर्द येथील ग्रा.पं. सदस्य अंकुश माफूर यांची यवतमाळ मध्यवर्ती सह.बँक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अंकुश माफूर हे मारेगाव तालुक्यातील बोरी खुर्द येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून सामाजिक बांधिलकीची नाळ जोडलेल्या माफूर हे मागील अनेक वर्षांपासून सरोदी समाजाचे प्रतिनिधित्व करीत विदर्भ प्रांताचे सचिव म्हणून कार्यरत आहे.
ग्रामीण भागातील वंचितांना न्यायिक भूमिका वटवित गत पाच वर्षांपासून काँग्रेस पक्ष बळकटीचे ऊर्जा स्रोत म्हणून त्यांचेकडे बघितल्या जाते. सामाजिक दायित्वाचे धनी म्हणून वणी विभागात अग्रेसर असणाऱ्या डॉ. महेंद्र लोढा यांचेसोबत राजकीय चळवळीत पदार्पण करीत मारेगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून पक्षाची मोट बांधण्याचे कार्य वाखान्याजोगे आहे. सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत सातत्याने हिरहिरीने भाग घेत त्यांच्या सकारात्मक कार्याची दखल घेवून काँग्रेस पक्षाने अंकुश माफूर यांचेकडे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व बहाल केले.
या निवडीने जनसामान्य, शेतकरी, पिडीतांचे प्रश्न निकालात काढण्यात आपण सदैव तत्पर असल्याचा आशावाद माफूर यांनी ‘विदर्भ टाईम्स’ शी बोलतांना व्यक्त केला.जिल्हा अध्यक्ष मनीष पाटील यांच्या स्वाक्षरीनिशी प्रदान करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात आपल्या निवडीचे श्रेय ते माजी आमदार वामनराव कासावार, माजी सभापती नरेंद्र ठाकरे, डॉ. महेंद्र लोढा, वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष कुळसंगे,उपाध्यक्ष जय आबड,बँक जिल्हा प्रतिनिधी राजू येल्टीवार यांना देतात.