– राज्य नाट्य स्पर्धेत सादरीकरण
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
सत्तर अंशी च्या दशकात अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पाडणाऱ्या राधाबाई बुधगावकर नाट्यसंचातील सदुचं लग्न हे नाटक मारेगाव वणी येथील कलावतांनी चंद्रपूर येथील राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले. या नाटकास प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
मुलींकडून हुंडा घेण्याच्या वाईट मानसिकतेत मुलाचे वडील पांडू तात्या असतात.पण या वाईट वृतीला लगाम लावण्यासाठी नियोजित वर हा स्वतःला तृतीपंथीप्रमाणे भासावतो. यात लग्नासाठी कमिशन मिळते म्हणून धावपळ करणारे बारीकराव व रामभाऊ यांची बरेच हाल होतात आणि यातून मोठी धम्माल उडते.
विशाल डाहाळे लिखीत या नाटकाचे दिग्ददर्शन प्राचार्य हेमंत चौधरी यांनी केले. अंजना उत्त्तम बहुउद्देशिय संस्था वणी यांनी हौशी नाट्य स्पर्धेत हे नाटक सादर केले. यात सदूची भूमिका हेमंत चौधरी यांनी वटविली.नाटकातील बारिकरावची भूमिका अँड. मेहमूद खान यांनी साकारत अक्षरशः हास्यात खिळवीत प्रेक्षकांची मने जिंकली.
सदुच लग्न या दोन अंकी नाटकातील कलावंतात रामभाऊ ची भूमिका विनेश मेश्राम, पांडुतात्या – रमाकांत लखमापुरे, शकुंतला -वैशाली वातीले, खंडेराव – गुलशेर खान, शांता – प्रगती मुरस्कार, बाळू – वैभव चौधरी, कांचन – आस्था शिंदे, मामा – पुरुषोत्तम गावंडे, नर्तकी -अवंतिका मुरस्कर,
गणपती – कथक मेश्राम, रिद्धी – कु. कांचन गुरनूले यांनी साकारली होती. तर गायिका म्हणून शर्वरी बाविस्कर, संगीत अजित खंदारे, नेपथ्य सुरज चिकटवार, रंगमंच व्यवस्था मोरेश्वर कनकुंटवार आणि वसीम खान.रंगभूषा मेघा कोडापे, वेशभूषा प्रणिता चौधरी यांनी आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. या नाटकात शेकडो प्रेक्षका पोट धरून हसले.