– राष्ट्रमातेच्या जयघोषाने दुमदुमली अवघी मारेगाव नगरी
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
विश्वहिंदू परिषद व बजरंग दल मारेगाव यांच्या वतीने भव्य शेकडो मोटारसाईकल तिरंगा रॅली काढण्यात आली. मारेगाव हनुमान मंदिर येथे भव्य आरतीचे आयोजन केले व नगरपंचायत ते संपूर्ण मारेगाव शहरात रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी जिजाऊ चौक येथे महापुरुषांना अभिवादन करीत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.मारेगाव येथील हनुमान मंदिरात रॅलीची समाप्त कारण्यात आली.
रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत अखंड भारत ची संकल्प देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाश्चात्य संस्कृती कडे वळत असलेले युवक आता भक्तिमय वातावरण कडे वळत आहे. मारेगाव शहरातील हनुमानचे मोठे मंदिर येथे दर शनिवार व मंगळवार ला हनुमान चालीसा चा पाठ करत युवक व नागरिक यात सहभागी होतात. या कारणाने नागरिकात एक नव्यानेच भक्तिमय वातावरण व उत्साह निर्माण होत असल्याचा प्रत्यय येत आहे.