Breaking News

मारेगाव सह तालुक्यात अवैध व्यवसायाचा महापूर

व्यसनाधीन , कौटुंबिक कलहाने तालुक्यातील आत्महत्येचा आलेख वाढला
– अर्जुनी नागरिक ठाण्यात धडकले
– ठाणेदारावर ग्रामीण भागातील अवैध व्यवसायाचे तगडे आव्हान

मारेगाव : दीपक डोहणे

मारेगाव तालुका अवैध व्यवसायाने पुरता बरबटलेला आहे. गाव तिथे अवैध व्यवसाय असे समीकरण बनले आहे.मात्र यावर आळा घालण्यासाठी येथील प्रशासन जाणीवपूर्वक हतबलता दाखवित असल्याचा आरोप होत आहे. किंबहुना या व्यवसायाने अनेक कुटुंब लयास जात असल्याचे भयाण वास्तव आहे.असेच एक अर्जुनी गाव व्यसनाधीनाने ग्रासले आहे.यावर पायबंद घालण्यासाठी येथील नागरिक पोलिसात सरसावले आहे.

मारेगाव शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे.वणी , मारेगाव व पांढरकवडा येथून देशी दारू आणून ग्रामीण भागात विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात फोफावले आहे.अर्जुनी येथील एका महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने गावात या गोरखधंद्याचा विडा उचलला आहे.अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करून संपूर्ण गाव नासविल्या जात आहेत हीच परिस्थिती तालुक्यातील जवळपास गावात आहे.

दरम्यान , या व्यवसायाने अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात कुटुंबात कलहाचे वातावरण आहे.याही कारणाने आत्महत्यांचे प्रमाणात वाढ होत असल्याचे वेदनादायी चित्र तालुक्यात आहे.खुलेआम सुरू असलेले दारू विक्री , जुगार , मटका व यामुळे व्यसन , खालावत असलेली आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक कलह होत असलेला विपरीत परिणाम आत्महत्येस प्रमुख कारण ठरते आहे.यातून मिळत असलेला मलिंदा सर्वश्रुत असतांना तालुक्यातील नुकतेच झालेल्या दोन हत्या याचाच परिपाक मानल्या जात आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

परिणामी अशाच चक्रव्युव्हात अडकलेले अर्जुनी येथील शेकडो ग्रामवासीयांनी मारेगाव पोलिसात निवेदन देत दारू विक्रीचा व्यवसाय तात्काळ बंद करा अन्यथा पोलीस स्टेशन समोरच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.शहरासह तालुक्याच्या चहू बाजूला सुरू असलेल्या व्यवसायाचे तगडे आव्हान मारेगाव ठाणेदार यांचे समोर उभे ठाकले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment