– मदुराई मर्चंड नेव्ही मध्ये झाले प्रशिक्षण
– देश सोडून करणार परदेशात कूच
– यश कवेत : मातेचा आला उर भरून
मारेगाव : दीपक डोहणे
ललिता अन प्रशांत पेंदोर यांच्या संसारवेलीवर “गौरी” नामक कळी उमलली.गौरी ही केवळ नऊ वर्षाची असतांना अचानक पितृतुल्य हरविले.मात्र वेगाव येथील दुडूदुडू धावणारी गौरी प्राथमिक आणि हायस्कूल शिक्षण वेगाव व वणी येथील महाविद्यालयात शैक्षणिक धडे गिरवीत पुढील शिक्षण औरंगाबाद येथून घेत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तिने संकल्प केलाय.आणि हा संकल्प कृतीत उतरवित तिला आता आयुष्याचा टर्निंग पॉईंट मिळत ती आता सातासमुद्रापार झेप घेणार आहे.तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे मर्चंड नेव्ही मध्ये प्रशिक्षण घेत अवघ्या दिवसातच परदेशात रुजू होतेय.वडील नसतांना आईच्या मनाची त्रेधातिरपट उडत असतांना नातेवाईकांचे मिळालेल्या शैक्षणिक सहकार्याने तिने प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घालून अवघ्या महाराष्ट्रात प्रथम येत मारेगावच्या शिरावर मानाचा तुरा रोवला आहे.गौरीच्या अप्रतिम यशाने ती सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.
मारेगाव तालुक्यातील वेगाव प्रशांत पेंदोर स्वतःचे वाहन चालवित कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.मात्र काही दिवसातच त्यांना एका दुर्धर आजाराने पछाडून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने आई ललिताच्या पायाखालची वाळू सरकत मायलेकीवर आभाळ कोसळले.मनात अनेक प्रश्न कालवाकालव करीत असतांना आई निरागस चिमुकलीला आधारवड समजत धीरगंभीर प्रसंगाला सामोरं गेली.दोघी मायलेकीवर हा खडतर प्रवास कसा सुकर करावा हा गंभीर प्रश्न समोर दिसत असतांना गौरी ही दहावी , बारावी होत शैक्षणिक झेप घेण्याची तयारी केली. त्यानुसार शिक्षणाची खंबीर खुणगाठ बांधत औरंगाबाद येथे खरा शैक्षणिक प्रवास सुरु केला.
बारावी उत्तीर्ण होत ती औरंगाबाद येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रम करिता गेली आणि औरंगाबाद तिच्या आयुष्याचा टर्निंग पाईन्ट ठरला.जिद्द , चिकाटी व आत्मविश्वाच्या बळावर अभ्यास आणि जागा निघेल तिथे अर्ज करायची.नेव्हीमध्ये जागा निघताच तिने अर्ज केलाय आणि तीचे सिलेक्शन होत प्रशिक्षणही झाले.काही दिवसात तिची तोंडी मुलाखत होत गौरी परदेशात नेव्हीमध्ये रुजू होणार आहे.परिणामी , एकुलत्या एक गौरी पेंदोर हिच्या फिनिक्स झेपात आजोबा पवन पेंदोर , काका प्रफुल्ल पेंदोर , आजोबा बबनराव पेंदोर , आईचे काका दिनानाथ आत्राम यांनी शिक्षणात वाटेल तसा भार उचलत गौरीने यशाला गवसणी घातली.
आई ललिता सोबत गौरी
अन खस्ता खाललेल्या आईचे उर भरून आले
गौरी ही केवळ 9 वर्षाची असतांना नियतीने आई ललिता हिच्या कपाळावरील कुंकू पुसले.नातेवाईकांनी मनाला दिलेला धीर.या बळावरच गौरी तू शिक्षणासाठी धावत राहा असा जणू काही संदेश देत जगण्यात निरागसता येवू दिली नाही.मुलामुलींचे आईसोबतचे नाते गर्भापासून सुरू होते.त्याला अंतही नसतो.तिने आपल्यासाठी किती खस्ता खालल्या , यजमान नसतांना एकांतवासात होणारी मनाची चिडफार हे सांगण्याची किव्हा यश संपादन केलेल्या मुलीला पाठीवर हात फिरवीत थँक्स म्हणण्याची वेळ ही फार क्वचितच येते.आणि तीच येथे अधोरेखित झाली.मुलीने स्वीकारलेले आव्हान..आव्हानात्मक जिवनाची खडतर वाट..मनाला बळ देणारी आई अन अत्यल्प दिवसात मिळालेलं मुलीचं यश..खस्ता खाललेल्या आईचं उर भरून येत असतांना भावविश्वात हरवून प्रेमळ व तेवढ्याच जड अंतःकरणाचा ‘थँक्स गौरी’ हा भावनेला साद देणारा शब्द गौरीच्या आयुष्याचा सकारात्मक आकार बदलवितोय. किंबहुना वेगावची गौरी आता सातासमुद्रापार झेप घेत असतांना तिने मारेगावच्या शिरावर मानाचा तुरा रोवला आहे.”विदर्भ टाईम्स” ( विटा ) परिवाराकडून गौरीचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस लखलाभ शुभेच्छा.