कुंभा अपडेट… पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

– चेतनच्या मृत्यूचे रहस्य गडद : आज उकलणार गूढ 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

तालुक्यातील कुंभा येथील सहा वर्षीय बालक बेपत्ता झाल्यागत त्याचा मृतदेह गदाजीबोरी शिवारातील नाल्यात सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली. बालकाच्या मृत्यूचे रहस्य गडद होत असतांना तालुक्यातील कुंभा व गदाजीबोरी येथील दोन युवकांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतल्याने निरागस बालकाचा नेमका मृत्यू? की हत्या? की अजून काही? या गंभीर प्रकरणाचे गूढ आज उकलणार असल्याने या वेदणादायी प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुंभा येथील चेतन मनोज चांदेकर हा सहा वर्षीय बालक मागील बुधवारला रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. घटनेचे गांभीर्य बघून पोलिसांनी श्वानपथकाच्या सयुक्त के -9 पथक व ठसेतज्ञ ला पाचारण करून शोधमोहीम राबविली. अखेर सहा किमी. अंतरावरील नाल्यात चेतनचा मृतदेह आढळल्याने या घटनेचा दुःखद शेवट झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी सदर गंभीर घटनेचा तपास गतिमान करून संशयाची सुई तालुक्यातील दोघांवर ठेवून कुंभा व गदाजी बोरी येथील दोन युवकांना रात्रीच ताब्यात घेतले. बोलविता व करविता धनी कोण?बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय? या दुर्देवी व संतापजनक आणि वेदणादायी घटनेने पंचक्रोशी हादरली असतांना बालकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment