पूर्ववैमनस्य उफाळला.. युवकाच्या पोटात खुपसला सुरा

 

– दोघेही गंभीर जखमी : एक नागपुर तर दुसरा चंद्रपुर रुग्णालयात 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

मारेगाव भारतीय स्टेट बँक समोर उभे असलेल्या तिघा मित्रापैकी एका सोबत संशायिताने वाद घातला व मांगरूळ येथे निघून गेले मात्र येथेही धक्का मारल्याच्या कारणाने दोघांचा वाद विकोपाला जात एकमेकास मारहाण झाली. यात एकाने थेट कोंबडी कापायचा सुरा आणत दुसऱ्याच्या पोटात खुपसला.तर दुसऱ्याने बेदम मारहाण करीत जखमी केल्याने एकच खळबळ उडाली असून संशायित मोहन हा नागपूर तर कृष्णा चंद्रपूर रुग्णालयात उपचार घेत आहे.

 

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मांगरूळ येथील कृष्णा भोयर हा बुधवारला सायंकाळच्या सुमारास आपल्या दोन मित्रासमवेत मारेगाव स्टेट बँक समोर उभे होते.याच दरम्यान संशायित आरोपी मोहन बापूराव मसगवळी (50) रा. वरुड ह. मु. मांगरूळ यांच्यात अकारण वाद सुरु झाला. काही वेळातच हा वाद शमला.

 

परिणामी, दोघेही मागेपुढे मांगरूळ येथे रवाना झाले. तब्बल तासाभरानंतर दोघांची भर वस्तीत ‘धक्का’ मारल्याच्या कारणाने वाद होत तो विकोपाला जात एकमेकास मारहाण केली.संशायित आरोपी मोहन मसगवळी याने थेट कोंबडी कापणाऱ्या सुरा या शस्राने कृष्णा भोयर (29) याच्या पोटावर वार केले. यात कृष्णा गंभीर जखमी झाला. तातडीने रुग्णालयात हलवून पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे .सदरील वादात पूर्ववैमनस्याची किनार असल्याची बोलले जात आहे.

 

परिणामी, या फिल्मी स्टाईल घटनेने गावात दहशत पसरून भीतीचे सावट निर्माण झाले असून तूर्तास प्रचंड खळबळ माजली आहे.

 

घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार संशायित आरोपी मसगवळी यांचेवर भांदवी कलम 118(1) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सागर दानडे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment