– कान्हाळगाव शिवारात झाडाला दिसला मृतदेह
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील प्रभाग क्रमांक 15 मधील साठ वर्षीय मोटार मेकॅनिकलने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केल्याची घटना आज गुरुवारला सकाळी 10.30 वाजताचे सुमारास उघडकीस आली.
मोटारसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणारे व नागोभाऊ म्हणून प्रसिद्ध असलेले नागोराव जयराम बावणे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आज सकाळी दुचाकीने तो घोंसा रोडने विवेकानंद शाळेच्या अलीकडून जाणाऱ्या पांदन रस्त्याने असलेल्या एका झाडाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका शेळीपालकास निदर्शनास आला.
या दुर्देवी घटनेची तात्काळ माहिती कुटुंबाना देण्यात आली. याबाबतची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविला.
दरम्यान, मृतकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.
मृतक नागो यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.