– राधाबाई कुमरे यांचे निधन
– सायंकाळी 5 वाजता मच्छिद्रा येथे होणार अंत्यसंस्कार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
वणी उपविभागातील सह्याद्री ई पोर्टल न्युजचे संपादक अमोल कुमरे यांच्या मातोश्री श्रीमती राधाबाई सूर्यभान कुमरे (रा. मंच्छिद्रा ता. मारेगाव) यांचे आज रविवारला दुपारी 12 वाजता नागपूर येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते.
राधाबाई कुमरे यांना दोन दिवसापूर्वी प्रकृती अस्वस्थतेने वणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आल्यानंतर मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांची आज प्राणज्योत मालविली.
मातोश्री राधाबाई यांच्या पश्चात दोन मुले, नातवंड असा आप्तपरिवार आहे. आज सायंकाळी 6:30 वाजताचे दरम्यान स्वगावी अंत्यविधी करण्यात येणार आहे.
“विदर्भ टाईम्स” समूह तथा वाचकाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.