– अन्यथा कार्यालयात कचरा टाकू
– तालुका काँग्रेस कमिटीचा गर्भीत ईशार
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगावातील नगरपंचायत प्रशासनाकडून घनकचऱ्याचे विल्हेवाट करण्याचे नियोजन इतरत्र असतांना मागील अनेक वर्षांपासून मार्डी रोड च्या कडेला टाकण्यात येत आहे.त्यामुळे सर्वत्र दुर्घन्धी पसरून येजा करणाऱ्यास नाहक त्रासाला समोर जावे लागत असल्याने याचा तात्काळ इतरत्र बंदोबस्त करा अन्यथा नाईलाजाने कार्यालयात आणून टाकू असा गर्भीत ईशारा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मागील अनेक वर्षांपासून मार्डी रोड लगत घनकचरा टाकण्यात येत आहे. यारस्त्याने शाळकरी विद्यार्थी सह नागरिकांची येजा मोठ्या प्रमाणात असते.
साठविलेल्या घनकचऱ्याने कमालीची दुर्घन्धी वाढली आहे. अलीकडेच व्हायरल मोठ्या प्रमाणात असल्याने याचा विपरीत परिणाम थेट आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.यातच भरीसभर म्हणून वराहचा त्रास नागरिकांना असह्य होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे.त्यामुळे हा कचरा यापूर्वी नियोजन केलेल्या खडकी येथे विल्हेवाट करून व्यवस्थापन करावे.अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
परिणामी, येत्या आठवड्यापर्यंत प्रशासनाने दखल न घेतल्यास काँग्रेस कडून हा घनकचरा थेट कार्यालयात आणून आंदोलन छेडण्याचा गर्भीत ईशारा देण्यात आला आहे.निवेदन देतांना यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मारोती गौरकार, नगरसेविका थारांगना पटेल , नगरसेवक आकाश बदकी, पदाधिकारी दुष्यन्त जयस्वाल, खालीद पटेल, सय्यद समीर, बबलू कुरेशी, धर्मराज ढोले, रंगदेव कनाके, रमेश धोपटे, सुभाष झोटींग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.