Breaking News

मारेगाव तालुक्यातील युवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

 

– राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळण्यासाठी पक्षाची मोट बांधण्यावर भर देण्यात येत मारेगाव तालुक्यातील असंख्य युवकांनी आपल्या हाताला ‘घड्याळ’ बांधली.

 

आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची मोट बांधण्यासाठी पुढारी कामाला लागले आहे.पक्ष मजबूत करण्यावर भर देत तालुक्यातील असंख्य युवकांनी पुसद येथे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

 

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष धानोरकर, वणी विधानसभा अध्यक्ष आशिष मोहितकर, मारेगाव तालुकाध्यक्ष दयाल रोगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी पक्षाला उभारी देण्यासाठी गावपातळीवर शाखा स्थापन करण्याचा आशावाद तालुका अध्यक्ष दयाल रोगे यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment