Breaking News

पक्ष प्रवेश… मारेगाव युवकांनी बांधली हाताला घड्याळ

तालुका अध्यक्ष दयाल रोगे यांच्या नेतृत्वात होतोय राष्ट्रवादीचा विस्तार

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाची पक्ष बांधणीला वेग आला असून तालुकाध्यक्ष दयाल रोगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत हाताला घड्याळ बांधली.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहत असतांना राजकीय पक्ष आपले संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यात पक्षाला बळकटी देत पक्षाची मोट बांधण्याचा विडा उचलला आहे. तालुका पदाधिकारी दयाल रोगे, शाहरुख शेख, विपुल ठेंगणे , मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात अनेक युवकांनी मारेगाव स्थित पक्ष प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, युवा जिल्हाध्यक्ष धानोरकर, वसंतराव घुइखेडकर यांच्या विशेष मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश घेण्यात आला असून यापुढे गाव तिथे शाखा करण्याचा आशावाद व्यक्त करून येत्या काही दिवसात मोठा पक्ष प्रवेश घेण्याचे सुतोवाच तालुकाध्यक्ष दयाल रोगे यांनी केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment