– झूल, मटाटी व घुंगराने सजला शेतकऱ्यांचा सखा
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
भारतीय कृषी संस्कृतीचा महत्वपूर्ण सण म्हणून मारेगाव स्थित मार्डीरोड ने मटाटी, झूल, अन घुंगरानी सजलेल्या बैलजोड्या. परंपरागत झडत्यांनी आणलेल्या बैलपोळ्यातील रंगत, वारकरांच्या समूहातील भजनाने पोळा सण उत्साहात व शांततेत साजरा झाला.
वर्षभर प्रचंड मेहनत करून कृतज्ञता व्यक्त करणारा सण बैलपोळ्यात शेकडो शेतकऱ्यांनी बैलजोड्या आपला सखा म्हणून तोरणाखाली नेला. पोळ्यात चिमुकल्यासयुवक व नागरिकांची मोठी गर्दी बघावायस मिळाली. तोरणाखालून निघालेल्या बैलजोड्याचे पूजन घराघरात करण्यात येवून पुरणपोळीचा नवैद्य भरविण्यात आला.
यंदाच्या पोळ्यातील झडत्या प्रबोधनाची किनार दिसली. नानाविध झडत्यांनी रंग भरला. झडत्यातून वाईट प्रवृत्तीचे चिमटे काढल्या गेले. व्यवस्थे आणि महागाईच्या आणि समाजात द्वेष पेरणाऱ्या प्रवृत्तीचा विरोधही झडत्याच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवला.