Breaking News

धक्कादायक…. मारेगाव ठाणेदार उमेश बेसरकर यांची एक्झिट

 

– हृदयविकाराचा तीव्र झटका : वणी येथे उपचारदरम्यान मृत्यू 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर (57) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज शनिवार सकाळी दहा वाजता निधन झाले. ठाणेदार बेसरकर यांच्या अकाली एक्झिटने पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.

 

गत दोन महिन्यापूर्वी 14 जून 2025 रोजी मारेगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. तालुक्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांच्यात सातत्य होते.मनमिळावू स्वभाव आणि न्यायिक भूमिकेने त्यांचा सूस्वभाव मारेगावकरांसाठी औटघटकेचा ठरल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

दरम्यान, आज कर्तव्यावर असतांना अचानक छातीत दुखू लागले. तात्काळ मारेगाव येथे प्राथमिक उपचारा नंतर वणी येथे हलविण्यात आले. मात्र,उपचाराला प्रतिसाद न दिल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

ठाणेदार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment