– वाहनधारक वैतागले : कारवाईची मागणी
बोटोणी : सुनील उताणे
येथील भारत पेट्रोल पंप वर पेट्रोल व डिझेल चा मागील काही महिन्यापासून सुकाळ असल्याने वाहधारकात कमालीचा संताप व्यक्त होत आहे. तूर्तास शेतीचे कामे आधुनिक पद्धतीने केल्या जात असतांना ट्रॅक्टर धारक पर्यायाने शेतीच्या कामाला फटका बसत आहे.
बोटोणी येथे मागील काही वर्षांपासून भारत पेट्रोलियम ची निर्मिती करण्यात आली. पेट्रोल डिझेल मिळण्याचा लपंडाव कायम असतांना आता गत दोन महिन्यापासून पेट्रोल डिझेल विक्री बंद अवस्थेत आहे. त्यामुळे तातडीचे कामे करण्यास वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बोटोणी परिसरात किमान वीस गावापेक्षा अधिकचे गावे संलग्नित आहे. सदर पेट्रोल पंप हायवे लगत असतांना अलीकडच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक घरात वाहन आहे. मात्र या पेट्रोल पंप वर मागील दोन महिन्यापासून पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांची ससेहोलपट होत आहे. किंबहुना हे पेट्रोल पंप केवळ शोभेचीवास्तू बनल्याचा आरोप होत आहे.
ग्राहक वर्गांची होणारी हेळसांड लक्षात घेता सखोल चौकशी अंती कारवाई करावी अशी येथील वाहन धारकांची मागणी आहे.