मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
तालुक्यातील बोटोणी येथील सरपंच सुनीता जुमनाके यांचेवर पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून अपात्र करण्यात आल्याने सरपंच पदाची धुरा आता उपसरपंच प्रविण वनकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
मागील दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सरपंच सुनीता विनोद जुमनाके यांचेवर यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात याचिका दाखल करण्यात येवून अपात्र करण्यात आले. मात्र अमरावती न्यायालयात अपिलात गेल्याने काही काळ पदावर आरूढ होत्या. अमरावती न्यायालयाने निकाल देत त्यांचे सरपंच व सदस्य पद अपात्र ठरविल्याने ग्रामपंचायत वर्तुळात पुरती खळबळ उडाली.
दरम्यान, सदर सरपंच पद उपसरपंच प्रविण वनकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. पेसा अंतर्गत असलेली बोटोणी ग्रामपंचायत मध्ये अनु. जमाती करिता कारभारी पद कायम असते.परिणामी,या पदाचा दुरुपयोग झाल्याने वादग्रस्त ठरत वनकर यांचेकडे बोटोणी ग्रामपंचायतचे कारभारी म्हणून आदेश अग्रेषित करण्यात आले. ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच एका दलित ग्रा. पं.सदस्याकडे बोटोणी चे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.