– मारेगावचे अँड. परवेज पठाण यांचे कृषी केंद्रात होते कार्यरत
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
मारेगाव येथील प्रसिद्ध विधिज्ञ अँड. परवेज पठाण यांचे कास्तकार कृषी केंद्रात कार्यरत पिसगाव येथील श्री. मोहन जयराम पाचभाई (55) यांचे दि.31 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजताचे दरम्यान अपघाती निधन झाले.मोहनभाऊ यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मोहनराव हे शनिवार ला नेहमी प्रमाणे नियमित कामकाज आटोपून सायंकाळच्या सुमारास स्वगावी पिसगाव येथे दुचाकीने जात होते.पाथरी फाट्यासमोर सरोदी बेड्यावरील शामराव मालेकर हे आपली मोटारसायकल निष्काळजी पणाने चालवित मोहन यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात मोहन पाचभाई हे खाली कोसळून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.मारेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर वणी येथे हलवितांना वाटेतच त्यांचा श्वास थांबला.
दरम्यान, मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून शामराव मालेकर यांचेवर कलम 106 (1),281, नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मागील 12 वर्षांपासून मारेगाव येथे कार्यरत मृदू आणि संयमी स्वभावाचे मोहन पाचभाई यांच्या अकाली निधनाने पिसगाव – मारेगाव येथे शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहे. रविवारला सकाळी अकरा वाजता पिसगाव येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली.