वीज पडून म्हैस ठार 

 

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

कुंभा : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील वेगाव (जुनी वस्ती) येथे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शेतकरी अरुण नानाजी टोंगे यांची म्हैस गावाशेजारील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात चराई करत होती. याचवेळी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आणि अचानक वीज पडली. दुर्दैवाने ही वीज थेट चराई करत असलेल्या म्हशीवर पडल्याने ती जागीच मृत्यूमुखी पडली.

या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली आहे. शेतकरी टोंगे यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. शासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची घोषणा करावी, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment