– मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील घटना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बालकाचा तलावात बुडून दुर्देवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील अर्जुनी येथे आज रविवारला सकाळी 9 वाजताचे दरम्यान घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. राकेश मोहन आत्राम (14) रा. कुटकी ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा असे जलसमाधी मिळालेल्या बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील आजोबा रामदास मडावी यांचेकडे शाळेच्या सुट्टया घालविण्यासाठी नातू राकेश हा मागील पंधरा दिवसापूर्वीपासून आला होता.
आज सकाळी बैलाला पाणी पाजण्यासाठी तो अर्जुनी पाझर तलावात गेला. बैल पाणी पीत असतांना एका म्हैस ने बैलास धडक देत राकेशच्या हातातील कासरे सुटले व राकेश हा पाण्यात पडला. तलावाच्या काठावर मोठे खड्डे असल्याने त्यात बुडून राकेशचा करून अंत झाला.
इयत्ता आठवीत शिकणाऱ्या, एकुलत्या एक राकेशच्या पश्चात आई, वडील व दोन लहान बहिणी आहे.