बिअरबार कामगाराचा विद्युत स्पर्शाने मृत्यू 

 

– मारेगाव येथील घटना 

मारेगाव : विटा न्युज नेटवर्क 

येथील राज्यमहामार्गांवरील एका बिअरबार मध्ये असलेल्या कामगाराला जिवंत विद्युत स्पर्श होवून जागीच ठार झाल्याची घटना आज दि. 22 मे रोजी दुपारी घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गणेश गणपत मेश्राम (28)रा. पेंढरी ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.

 

गेल्या अनेक दिवसापासून मारेगाव करणवाडी रस्त्यालगत असलेल्या एका बिअरबार मध्ये गणेश हा कामगार म्हणून कार्यरत होता.

 

आज गुरुवार ला दुपारी 12 वाजताचे सुमारास बार समोर असलेल्या संरक्षण जाळीला स्पर्श होताच जाळीला चिकटला. सहकार्यानी खुर्चीच्या सहाय्याने जाळीबाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. तात्काळ रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

एका होतकरू युवकाच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. मृतक गणेश याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व तीन महिण्याची मुलगी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment